Saturday, October 17, 2015

शिवअवमान गाजर परिषद



II  शिवरायांचे आठवावे रूप , शिवरायांचा आठवावा प्रताप
   शिवरायांचा आठवावा साक्षेप , भूमंडळी II
                   असेच  whats  app  चे  profile status ठेवून काही महाभाग अशा परिषदेमध्ये जात आहेत आणि तिथे जाऊन ऐकत आहेत कि रामदास हा औरंगजेबाचा हेर होता . तो गोसावडा शिवरायांच्या स्वराज्याकामात अडथळे आणत होता . हो खरेच आहे हे ..... समर्थांनी शंभू महाराजांना जे पत्र दिले त्यामधीलच या पंक्ती आहेत . याच पंक्ती आपले स्वताचे   whats  app  चे  profile status  ठेवून काहीजन गुडघ्यात मेंदू ठेवून अशा गाजर परिषदेमध्ये स्वताची बुद्धीची पातळी आजमावत आहेत हेच मोठे दुर्दैव आहे .
             मजेशीर बाब एक अजून कि १० वर्षापूर्वी ज्याला " शिवाजी " मधला " शि " सुधा माहिती न्हवता तोच आता अशा परिषदेमध्ये तथाकथित शिवचरित्र कथन करतोय . अरे जिथे आयुष्यातील ७० वर्षे फक्त शिवाभ्यासात घालवून ९३ वर्षाचे  शिवशाहीर म्हणतात " मी अजून सुधा  शिवचरित्राचा विद्यार्थीच आहे , तिथे हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला आम्हाला काय   शिवचरित्र सांगणार ? " शिवसन्मान " काय म्हणता राव ?? त्या भिकारचोट जेम्स लेन ने काशी केली ..... बरे केली ती केली पण इंग्रजी मधेच केली होती ना ....? मग ती आम्हा सामान्य जनतेपर्यंत मराठीत पोचवण्याचे काम कुणी केले ???? आई जीजामातान्बद्दल तो जेम्स लेन हे बोलला , ते बोलला ....... अलाना - फलाना  . अहो त्या हरामखोराचे " शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया " हे पुस्तक किती जनतेने वाचलेले होते ???? हे सर्व इतिहास विरोधी वाचन मराठीमधून  सर्वसामान्यापर्यंत कोणी पसरवले ???? जेम्स लेन पेक्षा विकृत गुन्हेगार तेच आहेत . आधी जनतेमध्ये इतिहासाबद्दल तेढ निर्माण करायची आणि नंतर अशा गाजर परिषदा घेऊन जातीजातीमध्ये द्वेष पसरवण्याचे विकृताकार्य करायचे  अहो शक्तिमान , हे शिवचरित्र आहे शिवचरित्र ..... राजकारणातील खोटी आश्वासने देण्याची पद्धत शिवरायांच्या चरित्रात तरी आणू नका .
                                       बरे अशा परिषदांना जातो कोण ? प्रत्येक परिषदेमध्ये अर्ध्याच्या वर तीच तीच भाडोत्री टाळकी समोर येतात . राहिला प्रश्न सामान्य जनतेचा . कधी प्रयत्न केलाय का हो ? एखादा सज्जनगडावरून लापशी खाउन आलेला श्रोता जर बैठकीला आला असेल तर बैठक झाल्यावर , sorry हा ,तुमची गाजर परिषद झाल्यावर त्याची मते जाणण्याचा .... अरे समार्थांबाद्दलची अशी घाणेरडी वक्तव्ये ऐकल्यानंतर त्याचा मनाचा काय भाव असतो हे बघायलासुद्धा जाऊ नका बर का ...... गुरुजींबद्दल बोलून एकदा पहिले आहेच तुम्ही आणि तुमच्या bandagulani ...... हा हा हा हा ....           
             परिषदेचा विषय  सुद्धा  ठरलेला . बाबासाहेबांचा पुरस्कार रद्द झाला पाहिजे . बर . आणि मग तो रद्द करून कुणाला द्यायला हवा ते पण सांगा कि एकदा . बाबासाहेबांचे शिवचरित्र मान्य नाही .... ठीक आहे . पण मग एवढे विस्तृत आणि समजायला  सोपे असे दुसरे कोणते तरी शिवचरित्र सांगा जनतेला . अहो एखाद्याला विरोध करण्यापूर्वी त्याच्या योग्यतेचा दुसरा कुणीतरी आणून दाखवा ना .... " महाराष्ट्र भूषण " पुरस्कार आहे तो ..... महाराष्ट्रातील जनतेने सर्वमान्य केलेला पुरस्कार .... लहानातल्या लहान पोरापर्यंत शिवराय पोचावालेत त्या महार्षीने...... त्यालाच तुम्ही शिवीगाळ करताय .... त्याच्याच अभ्यासावर शंका घेताय का तर मराठ्यांना कमी लेखले आणि तुमचे काय ते चार - दोन थातूर माथुर मुद्दे ....     
                         इच्छा नसताना सुद्धा पांडुरंग तात्यांनी तुमचे ते टुकार मुद्दे खोडून काढले कि हो . त्रयस्थ व्यक्ती संजय सोनवणी यांनी सुद्धा तुमच्या त्या डेंजर मुद्द्यांचा खरपूस समाचार घेतलाय कि . अजून काय आता तुमच्याच परिषदेमध्ये येउन एखाद्या शेंबड्या पोराने सुद्धा तुमची इज्जत काढायची वाट पाहताय का ? ........ परिषदा घेताहेत .....
                  अरे सर्वसामान्य भोळ्या जनतेला जाती -पातीच्या  राजकारणात अडकवून स्वताची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्या इतिहासकार शिव शाहीरावर शिंतोडे उडवताय........ जनता आता बोळ्याने दुध पिणारी राहिलेली नाहीये ..... बास करा आता तरी तुमचे धंदे . प्रत्येक वेळी सुरुवात ब्राह्मण द्वेशातूनच..... अरे ब्राह्मण एवढेच खुपतात तर मग प्रसिद्धी साठी कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरी कसे चालतात हो..... गुलाल तिथे चांगभले वृत्ती ...... दुसरे काय ....
             आणि शिव शाहीरांच्या पुरस्काराबद्दल म्हणाल तर विक्रीच्या बाबतीत उच्चांक गाठून विक्रमावर विक्रम स्थापणाऱ्या शिवचरित्रकार बाबासाहेब पुरांदारेना जनतेनेच तो " महाराष्ट्र भूषण " कधीच दिलाय . स्वताहून दिलाय. १५ ऑगस्ट ला त्यावर फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे. अजून खरा पुरस्कार तर बाकी आहे पण........ ज्या दिवशी महाराष्ट्रातील घराघरात " राजा शिवाचात्रापती " चे पारायण सुरु होईल ना तेव्हा बाबासाहेबांच्या कार्याला सलाम समजला जाईल . त्यावेळी तुम्ही परिषदा तर घेताल पण समोर ऐकायला रिकाम्या खुर्च्या असतील . कारण बहुजन जागा होतोय साहेब .....
        II  पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय  II 
        II  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी  महाराज कि जय  ईई
        II  भारत माता कि जय  ईई
        II हिंदू धर्म कि जय  II
चंदन जाधव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान
          

No comments:

Post a Comment