शिवअवमान गाजर परिषद
Sunday, October 18, 2015
Saturday, October 17, 2015
ब्रिगेडी प्रवृत्ती
श्री ब्रिगेडी
प्रवृत्ती ( प्रत्येक पोस्ट मध्ये
पत्राखाली वेगळे नाव आहे )
तुमचे पत्र
गुरुजीना पोचण्यापूर्वी माझ्या हातात पडले आणि मला काही शंका वाटल्यात . त्यांचे
निरसन करून द्या . विचारांचा लढा विचारांनीच . मगच तुमचे पत्र गुरुजीन्पर्यंत
पोचेल .
* प . पू . भिडे
गुरुजी , जय श्रीराम
जयतु जयतु
हिंदुराष्ट्र्म
आपल्या चरणी
साष्टांग दंडवत
= बरोबर
* स . न . वि . वि
. पत्रास कारण कि मी आपल्या गडकोट मोहिमेतला धारकरी बोलतोय .
= मोहीम केलेला
धारकरी अशा आशयाचे पत्र कधीच पाठवणार नाही . आणि तरीसुद्धा जर मोहीम केलेली असेल
तर मोहिमेतून काहीही घेतले नाही . शेवटी की मोहीम केली असे खोटे सांगून कोणीही
ब्रिगेडी धारकरी होत नाही . असो .
* गुरुजी
आत्तापर्यंत आम्हा मुलांना गडकोट मोहीम घडवलीत पण कधी कुपवाड सांगली कोल्हापूर
येथील एम आई डी सी नाही दाखवलीत
= आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात
शिवरायांचे गड आम्हाला दाखवलेत. वर्षातले ४ दिवस देवून आम्ही पूर्ण वर्षभरासाठी
पुरेल एवढी शिदोरी घेऊन परतलो . गुरुजी आम्ही मोहिम करतो त्या स्वार्थासाठी नाही .
एम आई डी सी पाहण्यासाठी तर मुळीच नाही .
परंतु वाट भरकटलेले गल्लीबोळात फिरणाऱ्या आमच्यासारख्या मुलांना मोहिमेतून
मिळणाऱ्या शिदोरीतून पोट भरण्यासाठी वाट मात्र जरूर दाखवलीत . फक्त कुपवाड सांगली कोल्हापूर येथीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या एम आई
डी सी मध्ये धारकरी दिसू लागलेत
* देव व धर्माच्या
नावाने नाही नाही ते उद्योग करायला शिकविले . परंतु उद्योजक बनायला नाही शिकविले .
= गुरुजी तुमच्या
संपर्कात येण्याआधी नाही नाही ते उद्योग करणारे आम्ही देव , धर्माच्या निमित्ताने एका योग्य वळणावर आलो .
तुमच्या संपर्कात आलो नसतो तर आमच्यावर सुधा विनयभंगाचे आरोपपत्र दाखल झाले असते .
एखाद्या संघटनेच्या कोल्हापूर अध्याक्षासारखे बलात्काराचा गुन्हा सुद्धा आमच्यावर
सिद्ध झाला असता . गुरुजी तुम्ही आम्हाला उद्योजक जरी नाही बनवले तरी आम्हाला एक
धर्मनिष्ठ , देशभक्त असा
स्वाभिमानी , एक आदर्श माणूसच
बनवलेत .
* मोहिमेच्या
माध्यमातून गडकोट चढायला शिकवलेत पण सैनिक अकेडमी नाही दाखवलीत . ती पण दाखवा
गुरुजी आम्हाला . पोलिस , सैनिक बनवा . देश रक्षणासाठी ( धर्माच्या नव्हे )
= गुरुजी सैनिक अकेडमी जरी तुम्ही दाखवली नसली
तरी मोहिमेच्या माध्यमातून गड चढायला शिकवलेत . आम्हाला आयुष्यात ज्या अडचणींना
सामोरे जायचेय त्यांचा सामना करायला शिकवलेत . मोहिमेच्याच माध्यमातून आम्हाला
शिवाजीराव भोसले सारखे वक्ता ऐकवलेत .राजीवभाई सारखा सहवास दिलात .
निनाद्रावांच्या मुखातून देशभक्ती , धर्मनिष्ठा काय असते ते दाखवले . मोहीम करूनच आमच्यातील एक
धारकरी सुरज सर्जेराव मोहिते ( वाई ) आपल्या भारतमातेसाठी हुतात्मा झाला .
आमच्यातले काहीजण सीमेवर सैनिक म्हणून गेले पण बरेचजण आतमध्ये राहूनच धर्मद्रोही
संगठनांचे कर्दनकाळ म्हणून कार्यरत आहेत . गुरुजी तुम्ही असे निष्ठावंत धारकरी
बनवलेत ज्यांच्यासाठी शिवछत्रपतिञ्चे गडकोट म्हणजेच एक सैनिक अकादमी बनली .
* आम्ही आजपर्यंत
झालो धारकरी . तुमच्या नादाला लागून मिळणार कशी नोकरी आणि छोकरी ?
= गुरुजी आम्ही
खरेच धारकरी झालो . आम्ही तुमच्याकडे नोकरी देणारे एजंट किंवा छोकरी पुरवणारे दलाल
म्हणून नाही पाहत . आपल्या गुरूकडे असे एजंट किंवा दलाल म्हणून पाहण्याची बांडगुळी
मानसिकता आमची निच्चीतच नाही . परंतु तुम्ही दाखवलेल्या मार्गाने स्वकर्तुत्वावर
नोकरी मिळवून हवी तशी छोकरी मिळवण्याची धमक मात्र आमच्यात आली .
* अफजलखानाचा
कोथळा शिवाजी महाराजांनी काढला , शाहिस्तेखानाची बोटे तोडली हे ओरडून सांगितलेत
. पण , मदारी मेहतर ,
दर्यासारंग , मीर मोहम्मद , काझी हैदर
हे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी होते हे का नाही सांगितले ?
= अफजलखानाचा
कोथळा , शाहिस्तेखानाची बोटे हे तर जगजाहीर आहे . गुरुजी तुम्ही ते सत्य आम्हाला परिपूर्ण इतिहासासहीत
सांगितलेत . सोबतच मदारी मेहतर या पात्राविशायीचे थोतांड सुधा सांगितलेत .
मुस्लिमांची हुजरेगिरी करण्यासाठी शिवरायांच्या हातात कुराणाची प्रत दाखवून
त्यांचे फ्लेक्स लावणाऱ्या धर्मद्रोह्यांनी काही मुस्लिम पात्रे इतिहासात कशी
घुसडली जातात हे आम्हाला इतिहासमहर्शि वा . सी . बेंद्रे , निनादराव यांनी सांगितले .
दर्यासारंग , मीर मोहम्मद , काझी हैदर
हि मुस्लिम नावे प्रकर्षाने जनतेच्या डोक्यात मारण्यात पटाईत काही
स्वयंघोषित इतिहासकार आम्हाला या मुस्लिम सहकार्यांनी थोड्याच कालावधीत केलेला
शिवद्रोह , राजद्रोह का बरे
सांगितला नाही . कलाम सारख्या देशनिष्ठ मुस्लिमाच्या पायाची धूळ जरी या तथाकथित
मुस्लिम सहकार्यांच्या कपाळी असती तरी
आम्ही त्यांचा उदो उदो केला असता गुरुजी .
*अफजलखानाच्या
वधाच्या वेळी शिवारायान्च्यावर वार करणारा कृष्णाजी भास्कर होता हे सांगितलेत ,
पण त्याचे आडनाव कुलकर्णी
होते हे कधीच का नाही सांगितलेत ? कारण तो ब्राह्मण होता म्हणून ?
= गुरुजी त्या
वकिलाचा उल्लेख प्रत्येक वेळी कृष्णा कुलकर्णीच केलात . आणि उगाच निरर्थक
व्यक्तीचा उल्लेख सतत करून आफ्जाल्खानासारख्या राक्षसाचा वध शिवरायांनी केला हि
घटना आमच्या डोक्यातून निघून जाईल अशी ब्रिगेडी मने तर गुरुजी तुम्ही नाही तयार
केलीत . प्रत्येक वेळी शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी तयार करण्यासाठी प्रयत्न
करताना गुरुजी तुम्ही ब्राह्मण , बहुजन दलित असा भेदभाव कधीच केला नाहीत . मुस्लिमांचे तळवे
चाटण्यासाठी आम्हाला हिंदू धर्माची जातीजातीत फूट पाडण्याचे काही गांडूळ संघतनेसारखे कधीच प्रयत्न
केले नाहीत . गुरुजी तुम्ही ब्रह्म जाणलेत . खरोखरीच कर्माने तुम्ही ब्राह्मण आहात
.
* गुरुजी तुम्ही
शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते म्हणून सांगितलेत . मग शहाजीराजे , जिजाऊ , जगद्गुरु तुकोबाराय हे गुरु नव्हते काय ? हे का लपवताय ? गुरुजी , रामदास स्वामींची घोषणा " जय जय रघुवीर
समर्थ " तर शिवरायांची " हर हर महादेव " कशी ? गुरु शिष्याची घोषणा वेगळी कशी काय ?
= गुरुजी , गुरु या शब्दाचा खरा अर्थ अजूनपर्यंत आम्हाला
उमगला न्हवता . शिवरायांचा प्रत्येक क्षेत्रातला गुरु वेगवेगळा होता हे तुम्हीच
आम्हाला सांगितलेत . तुम्हीच म्हणालात , शहाजी राजांनी शिवरायांना स्वराज्याची संकल्पना दिली . आई जिजावोने महाराजांना
जगण्याचे आणि स्वराज्याचे धडे दिले . शिवरायांना अक्षरओळख महादेव भटाने करून दिली
. दादोजी कोन्द्ददेवणी न्यायव्यवस्थेचे धडे शिवरायांना दिले हे वा सी बेंद्रे
यांनी उपलब्ध पत्रावरून पटवून दिले . रामदास स्वामिनी शिवरायांना अध्यात्मिक
शिक्षणातून ध्येय्निश्ठेकडे कसे जायचे याचे ज्ञान दिले . गुरु शिष्य परंपरेचा
उज्ज्वल इतिहास असणार्या भारत देशात गुरु आणि शिष्यांच्या घोषणेवरून त्यांच्यातील
नाते शोधणार्या बांडगुळआणि कधी
तुकोबारायांचे अभंग स्वमुखात उच्चारले असतील कि नाही याबाबत शंकाच आहे . घोषणा
वेगळ्या म्हणून गुरु शिष्यांच्या नात्यावर शंका घेणार्यांनी कधीतरी श्री कृष्ण -
अर्जुन , निवृत्तीनाथ - ज्ञानदेव , गुरुजी - धारकरी यांच्यातील नात्याचा अभ्यास
करावा .
* गुरुजी हा देश
धर्मांध मनुस्मृतीवर नव्हे तर भारतीय संविधानावर चालतो हे कधीच का सांगत नाही ?
= गुरुजी मनु या
क्षत्रिय राजाने अमलात आणलेली मनुस्मृती तुम्हीच आम्हाला सांगितलीत . भारतीय
संविधान बनवण्यापूर्वी बाबासाहेबांनी १४ स्मृतींचा अभ्यास केला होता ज्यात
मनुस्मृती पूर्णपणे अभ्यासली होती हे
स्वतः बाबासाहेबानीच सांगितलेय . भारतीय संविधानातील काही पळवाटा शोधून आज
हि बांडगुळे धर्माविरोधात कसे कार्य करतात हे सुधा सांगितलेत .
* आजपर्यंत आम्हाला
ब . मो . पुरंदरे यांचा धर्माद्वेशाने भरलेला शिवरायांचा इतिहास सांगितलात . पण आं
. ह . साळुंखे , मा . म . देशमुख , पानसरे यांचा शिवाजी कधीच नाही सांगितलात ?
= वरील तू
सांगितलेल्या इतिहासकारांचे ज्ञान हे ४ वर्ष घासून अभ्यास करून काठावर पास
झालेल्या विद्यार्थ्यासारखे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही .
* अजूनही काही हास्यास्पद आणि निरर्थक मुद्दे
पत्रात तू मांडलेस . त्यामध्ये तू टिळकांना , आगरकरांना , सावरकरांना द्वेषापोटी मध्ये आणलेस. आणि बाबासाहेब आणि
राजर्षी शाहू यांचे नाव मध्ये आणल्याशिवाय bandgulanche पोटपाणी भरणारच नाही . आणि मधेच काय रे सिंहगड , टिळकवाडा....... हा हा हा हा हा ..... पत्र वाढवायची खटाटोप
कशाला करतोस ? गम्मत ऐक . तुझ्या पत्राला उत्तर लिहित आहे
तोपर्यंतच कितीतरी धाराकार्यांची पत्राला उत्तरे आलीत . मी थांबतो इथेच .... पण
जाताजाता एक सांगतो मित्रा ..... गुरुजी शांत आहेत कारण ते संत माणूस आहेत .....
आणि म्हणूनच प्रत्येक धारकरी हातात पेन घेऊन आहे . पुन्हा जर असा पत्र वगैरे
लिहिण्याचा खोडसाळपणा केलास तर ..... अरे प्रत्येक धारकरी फक्त थुंकला न तरी वाहून
जाताल कि रे kidyamungisarkhe .
आणि कोण तो एक दिवटा ..
महाराजांनाच पत्र लिहितो काय , पेपर मध्ये झळकतो काय .... अरे गुरुजींच्या विरोधात लिहून , बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा रोगच जडलाय की काय तुम्हा bandgulana
. .... अजूनही गुरुजी
तुम्हाला हिंदू धर्मातील वाट चुकलेले अडाणीच समजतात . नाही त्या द्वेष पसरवणाऱ्या महाभागांच्या मागे लागण्यापेक्षा
बोललास तशी खरोखरीच एक मोहीम कर फक्त येताना ती ब्रिगेडी चप्पल बाहेर काढून ये आणि
एक सच्चा शिवापाईक बन .......
चंदन जाधव
श्री
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान
शिवअवमान गाजर परिषद
II शिवरायांचे आठवावे रूप , शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप , भूमंडळी II
असेच whats
app चे profile
status ठेवून काही महाभाग अशा
परिषदेमध्ये जात आहेत आणि तिथे जाऊन ऐकत आहेत कि रामदास हा औरंगजेबाचा हेर होता .
तो गोसावडा शिवरायांच्या स्वराज्याकामात अडथळे आणत होता . हो खरेच आहे हे .....
समर्थांनी शंभू महाराजांना जे पत्र दिले त्यामधीलच या पंक्ती आहेत . याच पंक्ती आपले
स्वताचे whats app चे profile
status ठेवून काहीजन गुडघ्यात मेंदू ठेवून अशा गाजर परिषदेमध्ये
स्वताची बुद्धीची पातळी आजमावत आहेत हेच मोठे दुर्दैव आहे .
मजेशीर बाब एक अजून कि १०
वर्षापूर्वी ज्याला " शिवाजी " मधला " शि " सुधा माहिती न्हवता
तोच आता अशा परिषदेमध्ये तथाकथित शिवचरित्र कथन करतोय . अरे जिथे आयुष्यातील ७०
वर्षे फक्त शिवाभ्यासात घालवून ९३ वर्षाचे
शिवशाहीर म्हणतात " मी अजून सुधा
शिवचरित्राचा विद्यार्थीच आहे , तिथे हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला आम्हाला काय शिवचरित्र सांगणार ? " शिवसन्मान " काय म्हणता राव ?? त्या भिकारचोट जेम्स लेन ने काशी केली .....
बरे केली ती केली पण इंग्रजी मधेच केली होती ना ....? मग ती आम्हा सामान्य जनतेपर्यंत मराठीत
पोचवण्याचे काम कुणी केले ???? आई जीजामातान्बद्दल तो जेम्स लेन हे बोलला , ते बोलला ....... अलाना - फलाना . अहो त्या हरामखोराचे " शिवाजी - हिंदू
किंग इन इस्लामिक इंडिया " हे पुस्तक किती जनतेने वाचलेले होते ???? हे सर्व इतिहास विरोधी वाचन मराठीमधून सर्वसामान्यापर्यंत कोणी पसरवले ???? जेम्स लेन पेक्षा विकृत गुन्हेगार तेच आहेत .
आधी जनतेमध्ये इतिहासाबद्दल तेढ निर्माण करायची आणि नंतर अशा गाजर परिषदा घेऊन
जातीजातीमध्ये द्वेष पसरवण्याचे विकृताकार्य करायचे अहो शक्तिमान , हे शिवचरित्र आहे शिवचरित्र ..... राजकारणातील
खोटी आश्वासने देण्याची पद्धत शिवरायांच्या चरित्रात तरी आणू नका .
बरे अशा परिषदांना जातो कोण ? प्रत्येक
परिषदेमध्ये अर्ध्याच्या वर तीच तीच भाडोत्री टाळकी समोर येतात . राहिला प्रश्न
सामान्य जनतेचा . कधी प्रयत्न केलाय का हो ? एखादा
सज्जनगडावरून लापशी खाउन आलेला श्रोता जर बैठकीला आला असेल तर बैठक झाल्यावर , sorry हा ,तुमची गाजर परिषद
झाल्यावर त्याची मते जाणण्याचा .... अरे समार्थांबाद्दलची अशी घाणेरडी वक्तव्ये
ऐकल्यानंतर त्याचा मनाचा काय भाव असतो हे बघायलासुद्धा जाऊ नका बर का ......
गुरुजींबद्दल बोलून एकदा पहिले आहेच तुम्ही आणि तुमच्या bandagulani ...... हा हा हा हा ....
परिषदेचा विषय सुद्धा
ठरलेला . बाबासाहेबांचा पुरस्कार रद्द झाला पाहिजे . बर . आणि मग तो रद्द
करून कुणाला द्यायला हवा ते पण सांगा कि एकदा . बाबासाहेबांचे शिवचरित्र मान्य
नाही .... ठीक आहे . पण मग एवढे विस्तृत आणि समजायला सोपे असे दुसरे कोणते तरी शिवचरित्र सांगा
जनतेला . अहो एखाद्याला विरोध करण्यापूर्वी त्याच्या योग्यतेचा दुसरा कुणीतरी आणून
दाखवा ना .... " महाराष्ट्र भूषण " पुरस्कार आहे तो .....
महाराष्ट्रातील जनतेने सर्वमान्य केलेला पुरस्कार .... लहानातल्या लहान पोरापर्यंत
शिवराय पोचावालेत त्या महार्षीने...... त्यालाच तुम्ही शिवीगाळ करताय ....
त्याच्याच अभ्यासावर शंका घेताय का तर मराठ्यांना कमी लेखले आणि तुमचे काय ते चार
- दोन थातूर माथुर मुद्दे ....
इच्छा नसताना सुद्धा पांडुरंग तात्यांनी तुमचे
ते टुकार मुद्दे खोडून काढले कि हो . त्रयस्थ व्यक्ती संजय सोनवणी यांनी सुद्धा
तुमच्या त्या डेंजर मुद्द्यांचा खरपूस समाचार घेतलाय कि . अजून काय आता तुमच्याच
परिषदेमध्ये येउन एखाद्या शेंबड्या पोराने सुद्धा तुमची इज्जत काढायची वाट पाहताय
का ? ........ परिषदा घेताहेत .....
अरे सर्वसामान्य भोळ्या जनतेला
जाती -पातीच्या राजकारणात अडकवून स्वताची
राजकीय पोळी भाजण्यासाठी त्या इतिहासकार शिव शाहीरावर शिंतोडे उडवताय........ जनता
आता बोळ्याने दुध पिणारी राहिलेली नाहीये ..... बास करा आता तरी तुमचे धंदे .
प्रत्येक वेळी सुरुवात ब्राह्मण द्वेशातूनच..... अरे ब्राह्मण एवढेच खुपतात तर मग
प्रसिद्धी साठी कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरी कसे चालतात हो..... गुलाल तिथे
चांगभले वृत्ती ...... दुसरे काय ....
आणि शिव शाहीरांच्या पुरस्काराबद्दल
म्हणाल तर विक्रीच्या बाबतीत उच्चांक गाठून विक्रमावर विक्रम स्थापणाऱ्या
शिवचरित्रकार बाबासाहेब पुरांदारेना जनतेनेच तो " महाराष्ट्र भूषण "
कधीच दिलाय . स्वताहून दिलाय. १५ ऑगस्ट ला त्यावर फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे. अजून
खरा पुरस्कार तर बाकी आहे पण........ ज्या दिवशी महाराष्ट्रातील घराघरात "
राजा शिवाचात्रापती " चे पारायण सुरु होईल ना तेव्हा बाबासाहेबांच्या
कार्याला सलाम समजला जाईल . त्यावेळी तुम्ही परिषदा तर घेताल पण समोर ऐकायला
रिकाम्या खुर्च्या असतील . कारण बहुजन जागा होतोय साहेब .....
II
पुण्यश्लोक
छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय II
II
धर्मवीर छत्रपती
श्री संभाजी महाराज कि जय ईई
II
भारत माता कि
जय ईई
II हिंदू धर्म कि जय II
चंदन जाधव
श्री
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान
Subscribe to:
Posts (Atom)